Description
कादंबरीचा पुढील भाग पहिल्या भागात गिरीश आणि एंजल यांचं उत्तुंग प्रेम दिसतं, तर हा दुसरा भाग एंजल आयएएस झाल्यानंतर करियर आणि प्रेम यांच्यामध्ये तिची कशी दोलायमान अवस्था होते, ते सांगतो. तिच्यावर मनापासून प्रेम करणारा गिरीश आत्मसन्मान आणि प्रेमभावना यांच्या द्वंद्वात अडकतो. एंजल आपल्या स्वप्नांसाठी आपल्या प्रेमाला, गिरीशला सोडून देईल की मग त्यांचं प्रेम काळाच्या या कसोटीचा सामना करेल? हे जाणून घ्यायचं असेल, तर कलेक्टर साहिबा या कादंबरीचा हा दुसरा भाग वाचायलाच हवा. कलेक्टर साहिबा २ मध्ये एंजल आणि गिरीश यांच्या विभिन्न दृष्टिकोनांमधून उभा राहणारा नात्यांमधला पेच आणि त्यांच्या महत्त्वाकांक्षांमुळे उभा राहणारा संघर्ष आपल्याला वाचायला मिळतो. ही कादंबरी प्रेम, करियर आणि आत्मसन्मान यांच्यातील नाट्य अत्यंत सुंदरतेने विणते. त्याचबरोबर वाचकांना हा विचार करायला भाग पाडते की, प्रेम आणि करियर यांना एकाचवेळी न्याय देणं शक्य आहे का की, मग यापैकी एका गोष्टीचा त्याग करणं गरजेचं असतं.
Reviews
There are no reviews yet.